‘तो’ आमदार झाल्यापासून माझे आयुष्य उद्ध्वस्त, भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप !

‘तो’ आमदार झाल्यापासून माझे आयुष्य उद्ध्वस्त, भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप !

लखनौ – उत्तर प्रदेशातील भाजपच्या आणखी एका आमदारावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. बदायूं जिल्ह्यातील बिसौली मतदारसंघातील भाजपा आमदार कुशाग्र सागर याच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. एका स्थानिक तरुणीने बलात्काराचा आरोप केला असून न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा पीडित तरुणीने दिला आहे. तो आमदार झाल्यापासून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले असल्याचं या तरुणीनं म्हटलं आहे. त्यामुळे कुशाग्र सागर यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याने एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच भाजपाच्या अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप झाला आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांवर आता जोरदार टीका केली जात आहे.  दरम्यान  हे प्रकरण सर्वांसमोर आल्यापासून मला धमक्या देण्यात येत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.परंतु मला न्याय न मिळाल्यास मी आत्महत्या करणार असल्याचं पीडित तरुणीने म्हटले आहे. तसेच  माझे कुटुंब गरीब आहे. माझे वडील बेरोजगार असताना आई ग्रीन पार्क परिसरातील काही घरांमध्ये घरकामासाठी जात असे. तसेच मदतीसाठी मला नेत असे. 2016 साली मी केवळ 16 वर्षांची असताना मी सागरच्या घरी घरकाम करण्यासाठी जात असे. तेव्हाच माझी आणि त्याची ओळख झाली. सागर माझ्याशी बोलू लागला. तसेच त्याने माझ्याशी विवाह करण्याचेही वचन दिले. तसेच माझ्या असहायतेचा गैरफायदा घेऊन 2012 पासून 2014 पर्यंत अनेक वेळा माझ्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप या तरुणीनं केला आहे.

दरम्यान या तरुणीचे सर्व आरोप भाजपा आमदारानं फेटाळले असून माझी आणि पक्षाची प्रतिमा बिघडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS