…तर हैदराबादचही नाव बदलणार, भाजप नेत्याचं वक्तव्य !

…तर हैदराबादचही नाव बदलणार, भाजप नेत्याचं वक्तव्य !

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचं नाव बदलून अयोध्या असं ठेवलं आहे. त्यानंतर आता हैदराबाद शहराचंही नाव बदलण्यात येणार असल्याचं वक्तव्य भाजपच्या नेत्यानं केलं आहे. जर तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर हैदराबाद व अन्य शहरांची नावं बदलून थोर व्यक्तिंची नावं देण्यात येतील असं वक्तव्य भाजपाचे नेते राजा सिंग यांनी केलं आहे. शहरांची नावं थोर व्यक्तिंची असली पाहिजेत. ज्यांनी राष्ट्रासाठी, तेलंगणासाठी व समाजासाठी कार्य केलंय अशा थोरांची नावं शहरांना द्यायला हवीत असं राजा सिंग यांनी म्हटलं आहे.

दरम्यान तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी 7 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत एमआयएम आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं दिसत आहे. कालच असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपला मुस्लीममुक्त भारत हवा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हैदराबादचं नाव बदलणार असल्याचं वक्व्य भाजपचे नेते राजा सिंग यांनी केलं आहे.

 

COMMENTS