“भाजपसोबत जाऊन घोडचूक केली, नाहीतर आणखी 15 जागा निवडून आल्या असत्या !”

“भाजपसोबत जाऊन घोडचूक केली, नाहीतर आणखी 15 जागा निवडून आल्या असत्या !”

नवी दिल्ली –  भाजपसोबत जाऊन मोठी चूक केली असून एनडीएत गेलो नसतो तर आणखी पंधरा जागा निवडून आल्या असत्या असं वक्तव्य एनडीएतून बाहेर पडलेल्या टीडीपीचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडून यांनी केलं आहे.  आम्ही भाजपासोबत जाण्याची घोडचूक केली नसती तर आमच्या १५ जागा आणखी निवडून आल्या असत्या असं ते म्हाणाले आहेत. तेलगु देसम पार्टीच्या ३७ व्या स्थापना दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. तसेच भाजपसोबत युती करण्याचा उद्देश राजकीय फायदा नसून राज्याचा विकास एवढाच होता परंतु विकासाकडे भाजपाने सपशेल दुर्लक्ष केलं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

 

 

दरम्यान एनडीएतून बाहेर पडलेल्या चंद्रबाबू यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपनं राज्याच्या विकासाके दुर्लक्ष केलं असल्यामुळे आपण भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. तर आमच्यासाठी फक्त राज्याचा विकास करण एवढंच ध्येय असून जे विकासाससाठी काम करतील आम्ही त्यांयासोबत आहोत असंही चंद्रबाबू यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रबाबूंच्या टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता भाजपवर जोरदार निशाणा साधला असून आगामी काळात टीडीपी भाजपविरोधात नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

COMMENTS