काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी आमदार यशोमती ठाकूर यांची नियुक्ती !

काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी आमदार यशोमती ठाकूर यांची नियुक्ती !

नवी दिल्ली  महाराष्ट्रातील आमदार यशोमती ठाकूर यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यशोमती ठाकूर या अमरावतीतील तिवसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार आहेत. तसेच, कर्नाटकचे प्रभारी आणि महासचिव के. सी. वेणूगोपाल यांच्यासोबत सहप्रभारी म्हणूनही ठाकूर काम पाहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान पेशाने वकील असणाऱ्या यशोमती ठाकूर या अत्यंत धडाडीच्या आमदार म्हणून ओळखल्या जातात. काँग्रेसच्या विविध आंदोलनांमध्ये त्यांनी अनेकवेळा सहभाग घेतला आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर संपूर्ण टीम बदलण्याची मोहीम हाती घेतली असल्याचं दिसत असून त्यांनी कालच महाराष्ट्रातील तरुण खासदार राजीव सातव यांची गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे.

COMMENTS