मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच येडियुरप्पांकडून मोठी घोषणा, काँग्रेस, जेडीएसची चिंता वाढली !

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच येडियुरप्पांकडून मोठी घोषणा, काँग्रेस, जेडीएसची चिंता वाढली !

बंगळूरू  कर्नाटक विधानसभेत बीएस येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी राज्यातील शेतक-यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसची चिंता वाढली असल्याचं दिसत आहे.दरम्यान येडियुरप्पांनी राज्यातील १ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसच्या काही आमदारांना विचलित करुन ते वेगळा विचार करू शकतात, अशी आशा भाजपाला वाटत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान यावेळी येडियुरप्पा यांनी शेतकरी कर्जमाफीच्या विषयाबाबत सरकारची भूमिकाही मांडली आहे. आपलं सरकार १ लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल, असं त्यांनी जाहीर केलं आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत याबाबतची औपचारिक घोषणाही केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आपलं सरकार पाच वर्षं पूर्ण करणार असल्याचं यावेळी ठामपणे येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS