युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची शिवसेनेत होणार बढती ?

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची शिवसेनेत होणार बढती ?

मुंबई – युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेनेत बढती मिळण्याची जोरदार चर्चा आहे. मंगळवारी पक्षाची मुंबईत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांची नेतेपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. याच कार्यकारिणी बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख पदावर फेरनिवड केली जाणार आहे. पक्षप्रमुख पदानंतर शिवसेनेत नेते हे महत्त्वाचे पद आहे. सध्या पक्षात 8 नेते आहेत. नेत्यांची संख्या वाढवण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या पदावर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांची पक्षांतर्गत जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.

 

वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर हा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा कार्यक्रम पार पडणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कार्यकारिणी बैठकीची प्रक्रिया आवश्यक असते. त्यानुसार ही ही प्रक्रिया होत असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख पदावर पुन्हा निवडले जाणार ही घटनात्मक प्रक्रिया आहे. तेच पक्षप्रमुख आहेत आणि आणि अनंत काळासाठी असतील. पक्षाचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS