भाजपच्या आग्रहामुळे ‘या’ जिल्हा परिषदेत शिवसेनेनं काँग्रेससोबतची युती तोडली!

भाजपच्या आग्रहामुळे ‘या’ जिल्हा परिषदेत शिवसेनेनं काँग्रेससोबतची युती तोडली!

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलच तापत असल्याचं तिसत आहे. सर्वच पक्षांकडून एकमेकांचे उमेदवार फोडले जात आहेत. अशातच आता औरंगाबाद जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. शिवसेना-भाजपाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून महापौर बंगल्यावर शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांची आज बैठक पार पडली.या बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांनी युती तोडण्याचा आग्रह केला त्यामुळे या बैठकीनंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी ही युती तोडल्याची घोषणा केली.

दरम्यान शिवसेनेने जिल्हा परिषदेमध्ये असलेले काँग्रेसची युती तोडावी. तेव्हाच आम्ही प्रचाराला सुरुवात करु. असा आग्रह भाजपा कार्यकर्त्यांनी केला होता. सध्या या जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष आहे, तर काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे. अडीच वर्षानंतरच्या निवडणुकीला तीन महिने राहिले आहेत. या तीन महिन्यानंतरच्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष असणार असल्याची घोषणा चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

COMMENTS