ब्रेकिंग न्यूज – 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडत जाहीर !

ब्रेकिंग न्यूज – 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडत जाहीर !

मुंबई – राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडत जाहीर करण्यात आली आहे.राज्यात  मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून एकूण 34 जिल्हा परिषदा अस्तित्वात आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आज ठरले. जिल्हा परिषद अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे आहे.

अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना

अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद

अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली

अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड

नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी
(सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती

नागरिकांचा मागास प्रवर्ग – ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड

खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा

खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर

COMMENTS