जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुकीत सरासरी 60 टक्के मतदान !

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुकीत सरासरी 60 टक्के मतदान !

मुंबई –  वर्धा व उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध 11 पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता आज सरासरी 60 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागात झालेले मतदान: हमदापूर (ता. सेलू, जि. वर्धा)- 65 आणि आनाळा (ता. परंडा, जि. उस्मानाबाद)- 54 टक्के मतदान झालं आहे.

पंचायत समितीच्या निर्वाचक गणात झालेले मतदान

पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग)- 53.29

नगाव (ता. जि. धुळे)- 47.56

तुर्काबाद (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद)- 44.55

संवदगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद)- 59.23

सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड)- 56.59

मारतळा (ता. लोहा, जि. नांदेड)- 74

काटी (ता, तुळजापूर, जि. उस्मानाबाद)- 56.21

सौंदड (ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया)-58.94

आजंती (ता. हिंगणघाट, जि. वर्धा)- 65.27

घुग्घुस-2 (ता. जि. चंद्रपूर)- 37.80

आणि मानापूर (ता. आरमोरी, जि. गडचिरोली)- 67.05.

या सर्व ठिकाणी घेण्यात आलेल्या निवडणकुती सरकासरी एकूण 60 टक्के मतदान झालं असून या निवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे.

COMMENTS