जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवण्याची आणखी एका पक्षाची घोषणा!

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवण्याची आणखी एका पक्षाची घोषणा!

मुंबई – राज्यातील पाचही जिल्हा परिषद व सर्व पंचायत समिती निवडणुका लढविण्याचा निर्णय आम आदमी पार्टीनं घेतला आहे. 25 नोव्हेंरला मुंबई येथे पार पडलेल्या राज्य समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आपचे राज्य संयोजक श्रीरंग रचुरे यांनी राज्यात येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुका लढण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाला आपचे महाराष्ट्र प्रभारी श्री दुर्गेश पाठक व समस्त राज्य समितीने सर्व सम्मतीने पारित केले. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढने आणि पार्टीला ग्रामीण व शहरी भागात मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य किंवा केंद्र सरकार स्थानिक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमधून लोकांची दैनंदिन सरकारी सेवा राबवतात. लोकांना मुलभूत सरकारी सेवा देणे हे आम आदमी पार्टीचे ध्येय आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, प्राथमिक आरोग्य सेवा, ग्रामीण भागातील रस्ते, गावामध्ये पिण्याचे पाणी इत्यादी मुलभूत सेवांना आम आदमी पार्टी प्राधान्य देणार आहे. आम आदमी पार्टीने केवळ सत्ता परिवर्तन केलेले नसून व्यवस्था परिवर्तनाचा विढ़ा उचलला आहे, याची प्रचीती आपल्याला दिल्लीतील सरकारी शाळेतून आतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, मोहल्ला क्लिनिकमधून सर्व आरोग्य सेवा, मोफत पाणी आणि स्वस्त दरात वीज पुरवठा, भ्रष्टाचारावर अंकुश आणण्याचे कार्य चालू आहे. हेच दिल्ली मॉडेल राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आणण्यासाठी आम आदमी पार्टीने राज्यातील सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचं आपचे महाराष्ट्र प्रभारी श्री दुर्गेश पाठक यांनी म्हटलं
आहे.

नागपूर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती निवडणुकीसाठी देवेंद्र वानखडे व जगजीत सिंग, अकोला – वाशीम जिल्हा परिषदेसाठी अन्सार शेख व परोमिता गोस्वामी, नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी डॉ सुनील गावित व श्रीकांत आचार्य, धुळे- डॉ अल्हेत्माज फैजी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्या त्या जिल्ह्यातील निवडणूक प्रमुख यांच्यासोबत संपर्क साधावा, अशी माहिती राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी दिली आहे.

COMMENTS