अहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी

अहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी

अहमदनगर – कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गटाच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली  रोहमारे विजयी झाल्या आहेत. त्यांना १०,०३० मते मिळाली तर भाजपच्या अश्विनी पाचोरे यांना ६७८० मते मिळाली. शिवसेनेच्या उमेदवार तिस-या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत. शिवसेनेच्या सिमा औताडे यांना ७६९० मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली  रोहमारे या २३४० मतांनी विजयी झाल्या आहेत.

COMMENTS