मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी देण्याची मागणी

मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी देण्याची मागणी

मुंबई – मुंबई महापालिकेतील महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवसी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली आहे. याबाबतच्या ठरावाची सूचना पालिका सभागृहात लवकरच मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसा ठराव मांडण्याचं पत्रही त्यांनी पालिकेला दिलं आहे. त्यामुळे आता सरकारी आणि निमसरकारी महिला कर्मचा-यांना अशा प्रकारची सुट्टी द्यावी अशी मागणी होत आहे. मुंबईतल्या एका खाजगी कंपनीने अशा प्रकारची सुट्टी दिल्यानंतर मासिक पाळीत सुट्टी देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अनेक देशांमध्ये मासिक पाळीमध्ये महिलांना सुट्टी देण्यात येते. त्याच धरतीवर मुंबई महापालिकेत सुट्टी देण्याची मागणी होऊ लागली आहे.

COMMENTS