पदासाठी नाही तर महाराष्ट्र घडवण्यासाठी ही यात्रा काढली – आदित्य ठाकरे

पदासाठी नाही तर महाराष्ट्र घडवण्यासाठी ही यात्रा काढली – आदित्य ठाकरे

जळगाव – युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज जळगाव जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नवा महाराष्ट्र घडवायचा असल्यानेच जन आशीर्वाद यात्रा सुरु केली असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा जनतेचा आशीर्वाद मिळावा म्हणूनच सुरु केली आहे. जळगावातल्या पाचोरा या ठिकाणाहून या यात्रेला सुरुवात झाली त्या ठिकाणी केलेल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी यात्रेमागचा उद्देश सांगितला. मला कोणतं तरी पद हवं आहे म्हणून मी ही यात्रा सुरु केलेली नसल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी मतं दिली त्या सगळ्यांचेच आभार मानायचे आहेत. त्यांची मने जिंकायची आहेत असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आज माझे आजोबा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तरी त्यांनी मला हेच सांगितले असते की ज्यांनी आपल्याला निवडणुकीत मतदान केले आहे त्यांचे आभार मानण्यासाठी जा. त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहू नकोस, त्यामुळेच तारीख, वार, मुहूर्त न पाहता मी ही यात्रा सुरु केली असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा चार जिवस चालणार आहे. 18 जुलैरोजी जळगाव, 19 जुलैला धुळे, मालेगाव, 20 जुलै रोजू नाशिक शहर, 21 जुलै रोजी नाशिक ग्रामीण, नगर आणि 22 जुलै रोजी नगर, श्रीरामपूर, शिर्डी असा या यात्रेचा प्रवास असणार आहे.

COMMENTS