हर्षवर्धन जाधवांच्या मुलंने उभं केलं आईच्याविरोधात पॅनेल

हर्षवर्धन जाधवांच्या मुलंने उभं केलं आईच्याविरोधात पॅनेल

औरंगाबाद – लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभव, कौटुंबिक कलह आणि वयोवृध्द दाम्पत्याला मारहाण यासारख्या घटनांमुळे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे नेहमीच चर्चेत असतात. ते सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकले असताना त्यांचा अकरावीत शिकणारा मुलगा आदित्यवर्धन जाधव याने ग्रामपंचायत निवडणुकीत चक्क आईच्या विरोधात पॅनेल उभा केला आहे.

वयोवृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्यामुळे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी देखील सुरु आहे. ग्रामंपचायतीला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या व हर्षवर्धन जाध यांच्या पत्नी संजना जाधव यांनी पॅनेल उभे केले. पण त्याचवेळी त्यांचा मुलगा आदित्यवर्धन याने वडील हर्षवर्धन राजकारणात सक्रिय होणार असून त्यांच्या पॅनलची घोषणा करण्यात आली आहे.
हर्षवर्धन यांना अटक झाल्यानंतर आदित्यने स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली आहेत. त्यात कन्नड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पॅनेल उभे करणार असल्याचे आदित्यवर्धन जाधव याने जाहीर केले. त्यामुळे आता जाधव कुटुबियांमध्ये कोण बाजी मारणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS