विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी 12 नावं ठरली, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली महत्त्वाची माहिती!

विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी 12 नावं ठरली, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली महत्त्वाची माहिती!

जळगाव – विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त 12 जागा भरण्यासाठी तिन्ही पक्षातील एकूण 12 नाव ठरली असल्याची महत्त्वाची माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. हा नावं गुपित असून ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहित असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे. तसेच योग्य वेळ आली की ती नावे आम्ही जाहीर करू असंही ते म्हणालेत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आज अनिल देशमुख अमळनेर आले होते. त्यावेळी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.

दरम्यान यावेळी बोलत असताना राज्यात लवकरच पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचंही ते म्हणालेत.यात मंत्रिमंडळाने 2 हजार 528 पदांना मंजुरी दिली आहे. यासंदर्भात कार्यवाही सुरू होती. तेव्हाच मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला. त्यामुळे भरती प्रक्रिया रखडली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

तसेच विधान परिषदेवर 12 जणांची नियुक्ती केली जाणार आहे. ती नावे तीनही पक्षांकडून सर्वानुमते ठरली आहेत. या नावांची मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्र लवकरच राज्यपालांना देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांनी या नावांना तत्काळ मंजुरी देणे अपेक्षित असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याचंही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंसह आदी नेते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या 

 

 

 

COMMENTS