जान कुमार सानूवर कारवाई होणार का?  गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया ! पाहा

जान कुमार सानूवर कारवाई होणार का? गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया ! पाहा

मुंबई – बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केलं. मराठीची चीड येते असं वक्तव्य गायक जान कुमार सानू यानं केलं. बिग बॉस’च्या खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अनेकांनी जान कुमार सानूवर टीका केली आहे. अनेकांनी त्याच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वांना आपआपल्या भाषेचा अभिमान असतो. याबाबत तक्रार आलेली आहे. जे झालं ते चुकीचं, योग्य ती कारवाई पोलीस करतील असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जान सानूसह हा वाद आता कलर्स वाहिनीच्याही अंगाशी येणार होता. मात्र, आता कलर्स वाहिनीने नमते घेत, आपला जाहीर माफीनामा सादर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या वाहिनीने माफी मागितली आहे. कालच्या भागात मराठी भाषेविषयी जो वादग्रस्त भाग प्रसारित झाला तो आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकत आहोत. महाराष्ट्रातील जनतेची माफी मागत असल्याचं वाहिनीने पत्रात म्हटलं आहे.

मनसेनेही जान कुमार सानूला इशारा दिला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जानच्या या वक्तव्यानंतर त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी.लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं.

जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नाॅमिनेट करतोय याला. असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केलं आहे.

COMMENTS