राज्यातील पोलीस कर्मचाय्रांसाठी महत्त्वाची बातमी, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला मोठा निर्णय!

राज्यातील पोलीस कर्मचाय्रांसाठी महत्त्वाची बातमी, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला मोठा निर्णय!

मुंबई – राज्यातील पोलिसांसाठी
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या महामारीत पोलीस कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. यामध्ये आतापर्यंत 51 पोलीस कर्मचारी यांचा दुदैवी मृत्यू देखील झाला आहे. या सर्व कर्मचाय्रांच्या कुटूंबतील सदस्यांना जवळपास 65 लाखांची मदत करण्यात येत आहे. तसेच जो पोलीस कर्मचारी शासकीय निवासस्थानी राहत असेल त्यांच्या कुटूंबियांना जोपर्यंत त्यांच्या निवृत्तीची तारीख आहे तोपर्यंत त्या घरात राहता येणार आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

COMMENTS