बाबरी प्रकरणाच्या निकालाचं शिवसेनेकडून स्वागत तर राष्ट्रवादीनं  व्यक्त केलं आश्चर्य !

बाबरी प्रकरणाच्या निकालाचं शिवसेनेकडून स्वागत तर राष्ट्रवादीनं व्यक्त केलं आश्चर्य !

मुंबई – बाबरी मशीद विध्वंस प्रकरणावर आज सीबीआयच्या विशेष न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निकालावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो असं राऊत म्हणाले आहेत. आम्हालाही हाच निर्णय अपेक्षित होता. कोर्टाच्या निर्णयाचं शिवसेना स्वागत करते. कोर्टानं सर्वांना निर्दोष सोडलं आहे. कोर्टानं कट नसल्याचे सांगितलं आहे. आता ‘त्या’ घटनेला विसरायला हवं असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि कामगार व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बाबरी विध्वंस प्रकरणाच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘देशातील न्यायालयांकडून निर्णय येतात. त्यावरून आश्चर्य नाही. या घटनेचे सगळीकडे व्हिडिओ असतानाही पुरावे नसल्याचं न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणावर न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे आश्चर्य वाटत नाही’, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

6 डिसेंबर 1992 रोजी घडलेल्या या प्रकरणातील आरोपी लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज सुनावणीदरम्यान 18 आरोपी कोर्टात उपस्थित होते. तर अडवाणी यांच्यासह काही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.

COMMENTS