सोलापूर – बार्शी तालुक्यातील वानेवाडीच्या गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. गावात पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती आहे,दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या या गावाला प्रशासन,राजकीय नेते यांनी दुर्लक्षित केलं आहे.गेल्या अनेक दिवसांपासून या गावकऱ्यांनी प्रशासनाकडे ,राजकीय नेत्यांकडे गावातील समस्यांविषयी तक्रारी केल्या मात्र त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
विशेष म्हणजे याच गावातील तरुण शंकर गायकवाड लोकसभेच्या रिंगणात आपलं नशीब आजमावत आहे,त्याने देखील बहिष्कारात भाग घेतला आहे.गावाने मतदानावर बहिष्कार टाकल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली आहे,गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
COMMENTS