माढा लोकसभेसाठी शरद पवारांविरोधात भाजपची नवी खेळी, ‘यांना’ देणार उमेदवारी ?

माढा लोकसभेसाठी शरद पवारांविरोधात भाजपची नवी खेळी, ‘यांना’ देणार उमेदवारी ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून पवार निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता पवारांविरोधात तगडा उमेदवार उभा करण्यासाठी भाजपकडून चाचपणी सुरु आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नाव यासंदर्भात आहे. परंतु  पवारांविरुद्ध तेवढ्या जोमाने लढून आव्हान उभे करू शकतील का या बाबत साशंकता आहे.

त्यामुळे देशमुख यांच्याऐवजी माढाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते यांना पक्षात आणून उमेदवारी देण्याचा विचार भाजपमध्ये सुरु आहे. परंतु रणजितसिंह यांच्याशी अद्याप संपर्क साधण्यात आलेला नसून त्यांच्या नावाचा विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान शरद पवार रिंगणात नसते तर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संजयमामा शिंदे यांना रिंगणात उतरविण्याची तयारी भाजपाने केली होती. परंतु आता शिंदे हे पवारांसोबत गेल्याने पवारांना टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार देण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. त्यामुळे रणजितसिंह पाटील यांनी उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता आहे.

COMMENTS