राज्यात भाजपला धक्का, “या” आमदाराची आमदारकी झाली रद्द !

राज्यात भाजपला धक्का, “या” आमदाराची आमदारकी झाली रद्द !

मुंबई – राज्यात भाजपची आमदार संख्या 1 ने घटली आहे. कारण भाजपच्या एका आमदाराची आमदारकी रद्द झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे भाजप आमदार बाळा काशीवार यांची आमदारकी रद्द झाली आहे. निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात काशीवार यांना कंत्राटदार असल्याची माहिती लपवली होती. काँग्रसचे पराभूत उमेदवार सेवक वाघाये यांनी काशीवार यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने काशीवार यांची आमदारकी रद्द केली आहे.

बाळा काशीवर यांची आमदारकी रद्द झाल्याने भाजपला धक्का बसला आहे. त भंडारा जिला भाजपमद्ये खळबळ माजली आहे. दरम्यान नागपूर खंडपिठाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची प्रतिक्रिया बाळा काशीवार यांनी दिली आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात कधी आणि काय निकाल लागणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS