उत्तर महाराष्ट्रात खडसेंनी पेटवली वात

उत्तर महाराष्ट्रात खडसेंनी पेटवली वात

जळगाव : भाजपला रामराम करून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उत्तर महाराष्ट्रातील बुरुंज पाडण्यास सुरुवात केली असून काही दिवसापूर्वीच भुसावळ नगरपालिकेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह 13 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. खडसेंच्या भूमिकेमुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात पक्ष वाढविण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांना पक्षात प्रवेश केला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरू केलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत खडसेंना ताकद देण्यात आली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी त्यांची महाविकास आघाडीकडून शिफारसही करण्यात आली आहे. त्यानंतर खडसे यांचे समर्थक आणि भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा रंग होती. मात्र, त्यांच्या माध्यमातून भुसावळातील 13 नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन, नगरपालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप घडवून आणला.

जळगाव जिल्हा भाजपसाठी हा मोठा ‘सेटबॅक’ मानला जात आहे. भुसावळ नगरपालिकेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह 13 नगरसेवक, त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक अशा अर्धशतकी संख्या असलेल्या मंडळीनी, 14 फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधले. त्यामुळे भाजप पुरता संकटात सापडला आहे. भुसावळ नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या भूमिकेकडे लक्ष सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS