भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा !

भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा, भाजप, काँग्रेसचा धुव्वा !

चंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला असून या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उमेदवार अनिल धानोरकर विजयी झाले असून या ते 3 हजार 616 मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे आपला बालेकिल्ला काय टिकवून ठेवण्यात शिवसेनेला पुन्हा एकदा यश आलं आहे.

 निवडणुकीचा संपूर्ण निकाल

एकूण जागा २७

निकाल घोषित २७

१६ शिवसेना

४ भाजप

४ भारिप

२ काँग्रेस

१ अपक्ष

दरम्यान 13 प्रभागातून 27 नगरसेवक आणि एका थेट नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक घेण्यात आली. या नगरपरिषदेवर 20 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. ती खेचण्यासाठी भाजप, रा. कॉ.-काँग्रेस आघाडी आणि आंबेडकरवादी पक्ष संघटना पुढे सरसावल्या होत्या परंतु त्यांना या निवडणुकीत सपशेल अपयश आलं असून शिवसेनेनं आपला बालेकिल्ला कायम राखला आहे.

COMMENTS