जळगाव – मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे !

जळगाव – मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे !

जळगाव – जळगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही आंदोलकांनी काळे झेंडे दाखविले आहेत. जळगाव लोकसभेचे भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमळनेर येथील विजय संकल्प सभेसाठी गेले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांना पाडळसरे जनआंदोलन समितीने काळे झेंडे दाखविले आहेत. यावळी सर्व आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान निम्न तापी प्रकल्पाकडे शासनाने निधी न दिल्यामुळे या आंदोलकांनी निषेध करत सभास्थळापासून काही अंतरावर काळे झेंडे दाखविले आहेत. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री तसंच शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील उपस्थित होते.

COMMENTS