मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातील कोविड-१९ रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण !

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातील कोविड-१९ रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण !

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज ठाणे येथील कोविड-१९ रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. बाळकुम-साकेत येथे १०२४ बेड्सचे तळ अधिक १० मजल्यांचे ठाणे कोविड-१९ रुग्णालय हे ठाणे महानगरपालिका, MMRDA, सिडको आणि MCHI, क्रेडाई ठाणे युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आले आहे.या महामारीचा प्रभावीपणे सामना करता यावा आणि कोविड बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करता यावे यासाठी हे रुग्णालय उभारण्यात आले आहे.

दरम्यान या रूग्णालयामध्ये एकूण १०२४ बेड्स असून ५०० बेड्स हे सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा असलेले आहेत. यातील ७६ बेड्स हे आयसीयूचे असून १० बेड्स डायलिसिस रूग्णांसाठी तर १० बेडस ट्रॉमासाठी ठेवण्यात आलेले आहेत. आवश्यकता वाटल्यास या रूग्णालयामध्ये अतिरिक्त ३०० बेड्स निर्माण करता येऊ शकतात.

तसेच या ठिकाणी कोविड रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असून रूग्णांना युनिफार्म, पॅथालाजी लॅब, एक्स रे, कोरोना टेस्टींग लॅब आणि मनोरंजनासाठी टीव्ही तसेच लॉकर्सचीही सुविधाही आहे. त्याचप्रमाणे सुमारे १००० किलोवॅट क्षमतेची जनरेटर्सची सुविधाही निर्माण करण्यात आली आहे.

COMMENTS