शेतकऱ्यांनी अडवले मुख्यमंत्र्यांना

शेतकऱ्यांनी अडवले मुख्यमंत्र्यांना

नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. तसेच घोडाझरी शाखा कालवा इथे सुरु असलेल्या कामाचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. या कालव्याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री पुढील दौऱ्यावर निघाले असता, प्रकल्पग्रस्तांनी त्यांचा ताफा अडवला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली आणि निवेदन स्वीकारले.

या पाहणी दौऱ्यात आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव अजय मेहता यांच्यासहित अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. घोडाझरी येथील कालवी पाहणी करीत असताना शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला.

शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून मुख्यमंत्री स्वतः गाडीतून खाली उतरून शेतकऱ्यांची चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांनी १५ वर्षांपासून आम्हाला एक थेंब पाणी मिळालं नाही, मोबदला मिळाला नाही अशी व्यथा मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला प्रकल्प पूर्ण करतानाच या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावं. तसंच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी रोजगार निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

COMMENTS