राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय !

राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय !

मुंबई – राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे यांनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली असून ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु करण्यात येणार आहेत. तसंच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही त्या ठिकाणी पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणच्या शाळा लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिक्षण विभागासोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या. यावेळी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. लवकरच त्यासाठीची घोषणा केली जाणार असून ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु करता येणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी मात्र परिस्थिती पाहून निर्णयात बदल केला जाणार आहे.

COMMENTS