देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीला जावे, पंतप्रधान मोदीही बाहेर पडतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टोला!

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीला जावे, पंतप्रधान मोदीही बाहेर पडतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टोला!

मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जावे, ते दिल्लीत गेले तर पंतप्रधान मोदीही बाहेर पडतील त्यांनी तिथेही जावे असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापुरात दौय्रावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. राज्यावर आलेल्या आपत्तीचं संकट फार मोठं आहे. राज्यात २२ ते २४ तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला होता. अता अतिवृष्टी होवू नये हिच प्रार्थना. पण जी काही मदत करायची त्यामध्ये सरकार मागे राहणार नाही असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना धनादेशाचे वाटपही करण्यात आले.

 

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता.
माझ्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दौऱ्याचं नियोजन केलं अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जावे, ते दिल्लीत गेले तर पंतप्रधान मोदीही बाहेर पडतील त्यांनी तिथेही जावे असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

COMMENTS