काँग्रेसला धक्का, ‘हा’ नेता देणार पक्षाला सोडचिठ्ठी ?

काँग्रेसला धक्का, ‘हा’ नेता देणार पक्षाला सोडचिठ्ठी ?

नवी दिल्ली – काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कारण काँग्रेसमधील नाराज नेते नवज्योतसिंग सिद्धू हे पक्षातून बाहेर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पंजाबमध्ये मोठा राजकीय भूंकप होण्याची शक्यता आहे. नवज्योतसिंग सिद्धू हे आम आदमी पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यानंतर पंजाब प्रमुख भगवंत मान यांनी याबाबत वक्तव्य केले असून, सिद्धू यांच्या आप प्रवेशावर कोणतीही अधिकृत चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांचे खाते बदलले होते. त्यामुळे नाराज झालेल्या सिद्धू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपविला होता. तेव्हापासून त्यांनी याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. अशातच आता ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. परंतु काँग्रेसमध्ये सर्व ठिक नसले तरी आम्ही नवज्योतसिंग यांची समजूत नक्की काढू, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

COMMENTS