चिक्की खाण्याएवढे राष्ट्रवादीला संपवणे सोपे नाही,  धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला!

चिक्की खाण्याएवढे राष्ट्रवादीला संपवणे सोपे नाही, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला!

परळी – केंद्राची सत्ता असतानाही ज्यांना परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा केंद्राच्या बारा ज्योतिर्लिंगाच्या यादीत समावेश करता आला नाही, साधी परळी – मुंबई रेल्वे सुरू करता आली नाही, त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत, असे सुनावतानाच चिक्की खाण्याएवढे राष्ट्रवादी काँग्रेसला संपवणे सोपे वाटले का? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

शनिवार दि.23 फेब्रुवारी रोजी परळीत होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षाच्या महाआघाडीच्या संयुक्त सभेच्या व परिवर्तन यात्रेच्या तयारी संदर्भात परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित शहरातील कार्यकर्त्यांच्या हालगे गार्डन येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

रायगड येथुन छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेऊन निघालेल्या परिवर्तन यात्रेचा समारोप प्रभु वैद्यनाथाच्या आशिर्वादाने होणार आहे. हे परिवर्तन केंद्रात, राज्यात घडवण्यासाठी आहे. त्यामुळे ही यात्रा केवळ आपल्या विरोधात आहे, असा गोड गैरसमज करून घेणार्‍यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला संपविण्याची भाषा सुरू केली आहे. त्यांनी सहज खाल्लेल्या 206 कोटी रुपयंाच्या चिक्की खाण्याएवढे राष्ट्रवादी कॉंग्रेसला संपवणे सोपे आहे काय ? अशा शब्दात नाम उल्लेख न करता त्यांनी पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. कधी काळी भाजपाचा बालेकिल्ला असणारी परळी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला झाली आहे. पुन्हा एकदा राज्याला या सभेच्या माध्यमातून परळीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद दाखवुन देण्यासाठी शनिवारची सभा यशस्वी करा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केले.

या मेळाव्यास ज्येष्ठ नेते सोमनाथअप्पा हालगे, न.प.उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, चंदुलाल बियाणी, वाल्मीकअण्णा कराड, दिपकनाना देशमुख, जाबेरखान पठाण, शरदभाऊ मुंडे, डॉ.संतोष मुंडे, श्रीकांत मांडे, सुरेश टाक, प्रा.विनोद जगतकर, संतोष शिंदे, अर्चनाताई रोडे, पल्लवीताई भोयटे, सुलभा साळवे, सय्यद सिराज, के.डी.उपाडे, अकबर काकर, लालाखान पठाण, नाझेर हुसेन, जयदत्त नरवडे, डॉ.आनंद टिंबे, अल्ताफ पठाण,अजय जोशी, दत्ता सावंत, मनजित सुगरे, गोपाळ कंकाळ, अनंत इंगळे, गफ्फार काकर, अनंत ढोपरे यांच्यासह सर्व पदाधिकारी आघाड्यांचे प्रमुख, नगरसेवक उपस्थित होते.

या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परळी शहर अल्पसंख्यांक, महिला आघाडीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यात हसीना बी अजमोदीन सय्यद, सलीमा बी शरू सय्यद, मीनाज बी सलीम इनामदार, मुमताज बी बाबु शेख, हयात बी रहिमशेख, जुलेखा बी उस्मान पिंजारी, जकीया बी शरू सय्यद आदींचा समावेश आहे.

COMMENTS