पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवल्यामुळे अभाविपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज ! VIDEO

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवल्यामुळे अभाविपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज ! VIDEO

धुळे – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवल्यामुळे पोलिसांनी हा लाठीचार्ज केला आहे. कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. राज्यातील परीक्षांचा गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या नुकसानीची जबाबदारी घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा, मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली. तसेच प्रवेश फी 30 टक्के कमी घ्यावी, परीक्षा शुल्क परत करावे, या विविध मागण्यांसाठी बुधवारी धुळ्यात आंदोलन केलं. यादरम्यान विद्यार्थ्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवली असता पोलिसांनी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या देखत अमानुष लाठीचार्ज केला आहे.

COMMENTS