दिग्विजय सिंह फक्त दिल्लीतून ‘आयटम’ घेऊन आले – भाजप खासदार

दिग्विजय सिंह फक्त दिल्लीतून ‘आयटम’ घेऊन आले – भाजप खासदार

नवी दिल्ली – नर्मदा यात्रा करणारे दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशसाठी काहीच केले नसून ते फक्त दिल्लीतून आयटम घेऊन आले असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप खादार मनोहर उंटवाल यांनी केलं आहे. दरम्यान या वादग्रस्त वक्तव्यानंतर उंटवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. यानंतर त्यांनी सारवासारव करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचं पहावयास मिळालं आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे नर्मदा यात्रेत सहभागी झाले होते. नर्मदा यात्रेत मध्य प्रदेश सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा केले असून ते लवकरच जनतेसमोर आणणार असल्याचं दिग्विजय सिंह यांनी म्हटले होते त्यानंतर उंटवाल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

दरम्यान दिग्विजय सिंह यांची ३ हजार किलोमीटरची नर्मदा यात्रा ९ एप्रिल रोजी संपली. या यात्रेदरम्यान त्यांनी मध्य प्रदेशमधील शिवराज सरकारकडून ५ साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याच्या निर्णयावरही टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा भाजपा खासदार मनोहर उंटवाल यांनी एका कार्यक्रमात समाचार घेतला. मात्र, टीका करताना त्यांची जीभ घसरली. ‘दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशसाठी काहीच केले नसून ते दिल्लीतून एक आयटम घेऊन आले आणि नर्मदा यात्रेवरही निघून गेले. आता त्यांना साधूसंताना लाल दिवा देण्यावर आक्षेप असल्याचं उंटवाल यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS