इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  पुतळ्यावरुन वाद !

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरुन वाद !

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीच्या वादानंतर आता इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उंचीवरून वाद निर्माण झाला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची उंची 350 फूट ठेवण्याची मागणी होती. मात्र नव्या आराखड्यानुसार पुतळ्याची उंची 251 फुट, तर खालचा चौथरा 99 फूट केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. स्मारकाच्या आढावा बैठकीत सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान आंबेडकरी समाजात याप्रकरणी मोठ्या प्रमाणात नाराजी असून याप्रकरणी सरकारला जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातूनही बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक असेल असे सांगण्यात येत होते. मग आता त्याचं काय झालं ? असा प्रश्न अनुयायी उपस्थित करत आहेत. तसेच याबाबत सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे मोठा वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

COMMENTS