भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय, कोणत्या पक्षात जाणार?

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय, कोणत्या पक्षात जाणार?

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याचे कारण म्हणजे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्याची एक क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांनी लवकरच पक्ष सोडणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबतचा संभ्रम असून या क्लिपमध्ये त्यांनी कोणत्याही पक्षाचा उल्लेख केला नाही. तर पदाबाबत बोलणी सुरु असल्याची माहिती आहे.

या क्लिपमध्ये खडसे यांच्या कार्यकर्त्यानं आपला काहीतरी निर्णय घ्या, आतापण भीजपनं तुम्हाला काही नाही दिलं. पुन्हा एकदा तुम्हाला डावलण्यात आलं आहे. त्यावर एकनाथ खडसे त्या कार्यकर्त्याला उद्या जायचं ठरलं असल्याचं म्हटलं आहे. भाऊ आता पण त्यांनी तुम्हाला डावललं, आम्ही खूप नाराज आहोत. त्यामुळे तुम्ही काही तरी निर्णय घ्या असं कार्यकर्ता त्यांना म्हणाला त्यावर खडसे यांनी अरे जाणार आहे, पण शेवटी पद-बिद काहीतरी ठरलं पाहिजे की नाही असं म्हटलं आहे. यावरुन खडसे लवकरच भाजपमधून पडणार असल्याचं दिसत आहे. याबाबतची बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

COMMENTS