ब्रेकिंग न्यूज – एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

ब्रेकिंग न्यूज – एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासांत जळगावामध्ये वेगवान राजकीय घडामोडी होणार असल्याचं दिसत आहे. भाजप नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांशी गुप्तगु झाली असल्याची माहिती आहे. तसेच अजित पवार खडसेंच्या भेटीला येत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अजित दादा खडसेंच्या भेटीला येण्याची चर्चा आहे.

तसेच एकनाथ खडसे मुक्ताईनगरमधून राष्ट्रवादीकडून लढणार असल्याची माहिती आहे. मुक्ताईनगरसह राष्ट्रवादी काँग्रेसचे चार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार असल्याची माहिती असून मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहर मतदारसंघात उमेदवार बदलले जाणार आहेत अशी चर्चा आहे.

दरम्यान भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या परंतु या दोन्ही याद्यात एकनाथ खडसे यांचं नाव नाही. त्यामुळे भाजपने खडसे यांच्या उमेदवारीचा पत्ता कापला असल्
याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

COMMENTS