मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी !

मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी !

चंद्रपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील वडाळा गावाच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद श्रीरामे असं आरोपीचं नाव आहे. गावातील दोन लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने हे पत्र त्यांच्या नावाने लिहीले होते.

गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. गेल्या महिन्यात मंत्रालयात एक निनावी पत्र आलं होतं. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांना लक्ष करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नक्षलीविरोधी कारवाई केल्यामुळे ते पत्र आलं होतं. आता हे इतरांना त्रास देण्यासाठी हे पत्र लिहिलं असल्याची प्राथमिक माहिती असली तरी पोलीस याची कसून चौकशी करत आहेत.

COMMENTS