राज्यपाल नियुक्त असलेल्या विधानपरिषदेच्या १२ जागांची नियुक्ती रखडणार ?

राज्यपाल नियुक्त असलेल्या विधानपरिषदेच्या १२ जागांची नियुक्ती रखडणार ?

मुंबई – राज्यपाल नियुक्त असलेल्या विधानपरिषदेच्या १२ जागांची नियुक्ती रखडणार असल्याचं दिसत आहे. या १२ जागांसाठी असलेला कालावधी जूनच्या पहिल्या आठवड्यात संपला आहे. तोपर्यंत १२ नव्या नावांची यादी राज्य सरकारकडून राज्यपालांकडे जाणं अपेक्षित होतं. मात्र अद्याप ही यादी राज्यपालांकडे गेलेली नाही. कारण या जागांसाठी असलेल्या निकषांवरती राज्यपाल आग्रही असल्याची माहिती आहे. त्यामुळे
राज्यपाल नियुक्त असलेल्या विधानपरिषदेच्या १२ जागांची नियुक्ती दोन महिन्यासाठी रखडणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात गेली काही दिवसांपासून संघर्ष पहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून पाठवावं, असा प्रस्ताव महाविकासआघाडीने दिला होता. मात्र राज्यपालांनी हा प्रस्ताव स्वीकारला नव्हता. अखेर विधानपरिषदेची निवडणूक घेऊन मुख्यमंत्र्यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात आलं. त्यानंतर विद्यापीठ परीक्षांच्या मुद्द्यावरूनही राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला. त्यानंतर आता राज्यपाल नियुक्त असलेल्या विधानपरिषदेच्या १२ जागांची नियुक्तीवरुन राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष पहायला मिळणार आहे.

COMMENTS