राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील 12 जागांसाठी हालचाली, एकनाथ खडसेंसह या 17 नेत्यांचं नाव चर्चेत!

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील 12 जागांसाठी हालचाली, एकनाथ खडसेंसह या 17 नेत्यांचं नाव चर्चेत!

मुंबई – राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील 12 जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडीत हालचाली सुरु झाल्यात. याबाबत उद्या कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीत राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषदेच्या जागांचा प्रस्ताव ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार असल्याची माहिती आहे. या यादीत नव्यानेच राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांचं देखील नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तयार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर उद्या ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यकडे सुपूर्द केली जाणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी आमदारकी जवळपास निश्चित झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी सनदी अधिकारी असलेले शिवाजी गर्जे, मुंबई संघटक आणि सोशल मीडिया सेलच्या प्रमुख आदिती नलावडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचं नाव चर्चेत असल्याची माहिती आहे.

शिवसेना

शिवसेनेकडून सुनील शिंदे, शिवसेना नेते, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, माजी आमदार, आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा मानला जाणारे सचिन अहिर, युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई, युवासेना पदाधिकारी, राहुल कनाल, सूरज चव्हाण आणि सलग तीन वेळा शिरुरचे खासदार राहीलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांचंही नाव या यादीत असल्याची माहिती आहे.

काँग्रेस

काँग्रेसकडून प्रवकिते सचिन सावंत, नागपूरमधील काटोलचे माजी आमदार, भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आशिष देशमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री नसीम खान, माजी विधानपरिषद आमदार, 2019 मध्ये पुण्यातून भाजप नेते गिरीश बापट यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले मोहन जोशी, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचही नाव या यादीत असल्याची माहिती आहे.

COMMENTS