महाआघाडीला धक्का, ‘या’ आमदारानं दर्शवला भाजपला पाठिंबा!

महाआघाडीला धक्का, ‘या’ आमदारानं दर्शवला भाजपला पाठिंबा!

नांदेड – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मोठं यश मिळवलं आहे. एकट्या राष्ट्रवादीने 54 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला 44 जागा, शिवसेनेला 56 जागा, तर भाजपला 103 जागा मिळाल्या आहेत. हा निकाल पाहता आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा अट्टाहास पाहता राज्यात काहीही होऊ शकते असे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेनेला पाठींबा देऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का अशा चर्चांना वेग आला आहे. त्यामुळे आता भाजपनेही हालचाली सुरु केल्या असल्याचं दिसत आहे.

दरम्यान आघाडीला धक्का बसला असून महाआघाडीतील एका आमदाराने भाजपला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे.काँग्रेस महाआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शेकापच्या आमदाराने भाजपला पाठिंबा दिला आहे. लोहा मतदार संघातून निवडून आलेले शेकाप आमदार शामसुंदर शिंदे यांनी भाजपला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे. तसंच नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत शामसुंदर शिंदे मुंबईलाही रवाना झाले आहेत. त्यामुळे आघाडीचा आमदार कमी झाला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS