…तर महाराष्ट्रात हाफ सेंच्युरीही गाठता येणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा !

…तर महाराष्ट्रात हाफ सेंच्युरीही गाठता येणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा !

मुंबई – गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला एक हाती सत्ता मिळाली असली तरी पाटीदार समाजाच्या असंतोषाचा फटका भाजपला चांगलाच बसला असल्याचं दिसत आहे. भाजपचे अध्यक्ष  अमित शहा यांनी भाजपला 150 जागा मिळतील असा दावा केला होता. परंतु यावेळेस भाजपला 100 चा आकडा ही गाठता आला नाही. भाजपवर नाराज असलेल्या पाटीदार समाजामुळे भाजपला हा फटका बसल्याचं दिसून आलं आहे.

त्याचबरोबर आता महाराष्ट्रातील मराठा समाजही आरक्षणावरुन आक्रमक झाला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी सरकारविरोधात पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये सरकारला इशाराच देण्यात आला आहे. हुकलेले शतक हा इशाराच समजा, महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष कराल तर पुढच्या निवडणुकीत अर्धशतकी टप्पाही पार करणे अवघड होईल, तोच मराठ्यांचा करारा जबाब समजा, असा इशाराच मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. मुंबईत ठिकठिणी अशाप्रकराचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

गुजरातमध्ये ज्याप्रमाणे पाटीदार समाजाच्या असंतोषाचा फटका भाजपला बसला आहे. असाच फटका महाराष्ट्रातही आरक्षणाची मागणी करणा-या मराठा समाजाकडून बसू शकतो असा अंदाज आता वर्तवला जात आहे.

 

COMMENTS