राज्यातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण, ट्वीट करुन दिली माहिती!

राज्यातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण, ट्वीट करुन दिली माहिती!

मुंबई – दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. काही राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग राज्यमंत्री बच्चू कडू यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करन दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी असं ट्वीट बच्चू कडू यांनी केलं आहे.

बच्चू कडू यांचा काही दिवसांपूर्वी घसा खवखवत होता. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संशय आला. त्यांची तातडीने रक्त तपासणी करण्यात आली. त्यांचा पहिला रिपोर्ट संशयास्पद आला. मात्र, दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. परंतु पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी केली असता त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

COMMENTS