पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी धनंजय मुंडेंची मोठी खेळी !

पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी धनंजय मुंडेंची मोठी खेळी !

लातूर  पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसला असून मुंडे गटाचे खंदे समर्थक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. विधानपरिषद निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ रमेश कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशामुळे त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यात येणार आहे. आमदार दिलीपराव देशमुख यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात येणार असून तीन टर्म दिलीपराव देशमुख यांनी ही जागा अबाधित ठेवली होती. मात्र नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी यावेळी जागा सोडली जात असल्याची माहिती आहे.

दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी मोठी खेळी खेळत कराड यांना संधी दिली आहे. रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाणार असल्याचं बोललं जात आहे..

 

COMMENTS