‘या’ तीन नगरपरिषदांसाठी 24 मार्चला मतदान !

‘या’ तीन नगरपरिषदांसाठी 24 मार्चला मतदान !

मुंबई – पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा) या तीन नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, पालघर, सिंदखेडराजा व लोणार या नगरपरिषदांच्या मुदती एप्रिल 2019 मध्ये संपत आहेत. या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 28 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. 3 व 4 मार्च 2019 या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देनपत्रांची छाननी 8 मार्च 2019 रोजी होईल. मतदान 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 25 मार्च 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

COMMENTS