या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका

या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका

मुंबई- मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं दिसत असला तरी नागपूर आणि अमरावती विभाला अद्यापही धोका कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेतली. या पथकाने विदर्भातील चार जिल्ह्यांबाबत काही निरीक्षणं नोंदवली आहे. अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणासंदर्भात नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडली. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय पथकातील सदस्य, तसंच राज्य टास्क फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते. मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यासही यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय पथकाकडून आढावा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, महाराष्ट्राने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या नविन रुग्ण संख्येचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र शहरी भागापेक्षा नंदूरबार आणि भंडारा सारख्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येचे प्रमाण का वाढत आहे? याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. राज्यात आरोग्य सुविधेत कमतरता नाही, तरीही नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील यंत्रणा अधिक सतर्क कराव्या अशी सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

COMMENTS