नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का !

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का !

नाशिक – नाशिकमध्ये राष्ट्रवादीनं शिवसेनेला धक्का दिला असून नाशिकमधील सिन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच नगरसेवक फुटले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना बंडखोरालाच निवडून आणले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रणाली गोळेसर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे शिवसेनेच्या बाळासाहेब उगले यांनी बंडखोरी करत त्यांच्याविरोधात अर्ज भरला होता. बाळासाहेब उगले यांनी बुधवारी झालेल्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे गटाच्या सहाय्याने पंधरा मते मिळवली. तर प्रणाली गोळेसर यांना 14 मतांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी पक्षाविरोधात मतदान केलं आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे.

COMMENTS