राष्ट्रवादीचे माजी खासदार लक्ष्मण जाधव यांचे निधन !

राष्ट्रवादीचे माजी खासदार लक्ष्मण जाधव यांचे निधन !

सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  माजी खासदार लक्ष्मण जाधव पाटील यांचे आज निधन झाले. वृध्दपकाळाने त्यांचे निधन झाले असून राष्ट्रवादीचे ते दोन वेळा खासदार झाले होते. राष्ट्रवादीच्या पायाभरणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात असून अनेक राजकीय नेत्यांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते 81 वर्षांचे होते. शरद पवार जुने सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. साताऱ्यात सर्वप्रथम त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला होता.

लक्ष्मणराव पाटील हे पार्किन्सन आजाराने त्रस्त होते. महिनाभरापूर्वी पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यांच्या मागे पत्नी सुमन पाटील, मुलगा मिलिंद, नितीन, आमदार मकरंद पाटील, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान आज दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईतून साताऱ्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर विकासनगर येथील त्यांच्या घरी थोडावेळ अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवण्यात येईल. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दर्शनासाठी ठेऊन बोपेगाव या त्यांच्या मुळगावी नेण्यात येणार आहे.

COMMENTS