राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांना विधान परिषदेवर संधी, उद्या घेणार आमदारकीची शपथ!

राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांना विधान परिषदेवर संधी, उद्या घेणार आमदारकीची शपथ!

मुंबई – राष्ट्रवादीनं दोन नेत्यांना विधान परिषदेत संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असलेले शिवाजीराव गर्जे आणि युवती राष्ट्रवादीच्या मुंबईच्या अध्यक्षा अदिती नलावडे यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही नेते उद्या आमदारकीची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या या दोन जागा रिक्त झाल्याने राष्ट्रवादीकडून या दोन नेत्यांना विधान परिषदेत पाठवलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादीकडून सहा वर्षांपूर्वी राज्यपाल नियुक्त सदस्य विधान परिषदेवर घेण्यात आले होते. त्यातील राहुल नार्वेकर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. नार्वेकर यांनी शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती. तर दुसरे राम वडकुते यांनी पक्षावर नाराज होत आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे विधान परिषदेच्या या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे या दोन जागांवर शिवाजीराव गर्जे आणि अदिती नलावडे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS