डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर !

डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर !

उस्मानाबाद – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी यांच्यातील शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. आमदार पाटील यांनी वडिलांना अर्ध्या रस्त्यात सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला, असल्याची टीका सुळे यांनी राणा पाटील यांच्यावर केली होती. त्यानंतर डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी पत्रक काढून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. डॉक्टर पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, खासदार सुळे या माझ्या कन्या प्रमाणे आहेत. त्यांनी माझी काळजी घेतली त्याबद्दल त्यांचे आभार.

पक्षांतर्गत कुरघोड्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. त्यांना वेळीच लगाम घातला असता तर आज पक्षावर ही वेळ आली नसती. असेही डॉक्टर पाटील यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार शहरात येत आहेत. आता ते या कार्यक्रमात आमदार पाटील यांच्या भाजप प्रवेशाला कसे प्रत्युत्तर देतात, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS