शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात !

शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात !

पुणे, लोणावळा – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला आहे. मुंबईच्या दिशेने जात असताना या ताफ्यातील पोलीस पायलेटिंग मोटार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या खाली उलटली आहे. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये एकाला किरकोळ मार लागल्याची माहिती आहे.

दरम्यान शरद पवार यांचा ताफा आज सकाळी मुंबईच्या दिशेने जात असताना ताफ्यात मागे असलेली पोलीस व्हॅन क्र. (एमएच 12 एनयु 5881) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यात पलटी झाली. यावेळी महामार्गावरील देवदूत पथक व खंडाळा महामार्ग पोलिसांनी तात्काळ धावून आले. गाडीमधील चालक व किरकोळ मार लागलेल्या पोलीस कर्मचार्‍यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थीर आहे.

COMMENTS