सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नवा खुलासा, सचिन सावंत आणि प्रताप सरनाईकांची विरोधकांवर जोरदार टीका!

सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नवा खुलासा, सचिन सावंत आणि प्रताप सरनाईकांची विरोधकांवर जोरदार टीका!

नवी दिल्ली – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाबाबत एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. सुशांतची हत्या नाही तर हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं एम्सच्या डॉक्टरांच्या पॅनलने सीबीआयला म्हटलं आहे. एम्सचे डॉ. सुधीर गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सुशांतची आत्महत्या नसून त्यांची हत्या झाल्याचा दावा सुशांतचे कुटुंबिय आणि त्यांच्या वकीलाने केला होता. मात्र एम्समधील डॉक्टरांनी सुशांतची हत्या नाही तर हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचं समोर ठेवूनच तपसा करण्यास सुरुवात केली होती. परंतु, याप्रकरणी मुंबई पोलिसांवर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे सुशांतने आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. परंतु, सोशल मीडियावर करण्यात येत असलेले आरोप, सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहीमा आणि सुशांतच्या कुटुंबियांचे दावे यांमुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपावण्यात आलं होतं.

परंतु आता एम्समधील डॉक्टरांनी केलेल्या खुलाशामुळे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई पोलिसांची पाठराखण केली आहे.
मुंबई पोलिसांनी केलेली चौकशी प्रामाणिक आणि स्पष्ट होती असं सावंत यांनी म्हटलं आहे.

तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात राजकारण करणारे तोंडघशी पडले असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS